Nashik District Innovation Council

Fostering Creativity, Innovation! Building Innovation Culture !!

About NDIC

केंद्र शासनाने सप्टेंबर, 2010 मध्ये नॅशनल इनोव्हेशन कौन्सिलची स्थापना केलेली आहे. या  कौन्सिलने केलेल्या शिफारशीनुसार शासन निर्णय क्रमाांक एसआयसी-2113/प्र.क्र.-1/2013/1471,
दिनांक ४ मार्च ,20१4 अन्वये स्टेट इनोव्हेशन कौन्सिलची स्थापना करण्यात आलेली आहे. राज्यासाठी
नव संकल्पनेचा आराखडा तयार करुन त्या संकल्पनांना मूर्तरुप देण्यासाठी पूरक वातावरण निर्मिती
करणे, तसेच त्याबाबतचा प्रचार व प्रसार करण्यास सहाय्य करणे, नविन सांकल्पनाांचा शोध घेण्यासाठी
स्थानिक शाळा, विद्यापीठे तथा सांशोधनात्मक सांस्था यामधून तज्ञांव्दारे विद्यार्थी तरुणवर्गाला
मार्गदर्शन करणे पयायाने देशाच्या आर्थिक विकासास चालना देणे हे काम प्रामुख्याने स्टेट इनोव्हेशन
कौन्सिलकडे सोपविण्यात आलेले आहे. स्टेट इनोव्हेशन कौन्सिलचे काम अधिक प्रभाविणे होण्यासाठी
ग्रामीण स्तरावर देखील याबाबतची जागृती करणे आवश्यक आहे. त्याकरीता कृषी, फलोत्पादन,
स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा या मूलभूत बाबीखेरीज दूरसांचार, पणन,
जैवतंत्रज्ञान व सूक्ष्म तंत्रज्ञान, पर्यावरण ,अपारंपारिक ऊर्जा तथा लोककलांचे जतन इत्यादि विविध
क्षेत्रात ग्रामीर् स्तरावर लोक जागृती करण्याची व सामान्य लोकांना या उपक्रमात सहभागी करुन
घेण्याची आवश्यकता आहे. त्याकरिता स्टेट इनोव्हेशन कौन्सिलला सहाय्यभूत ठरेल अशी
जिल्हास्तरावर, जिल्हा नाविन्यता परिषद (DIC) स्थापन करण्याची बाब शासनाच्या विधाराधीन होती.
याबाबत सर्वकष विचार करुन शासनाने सर्व जिल्हांसाठी खालीलप्रमाणे जिल्हा नाविन्यता
परिषद स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे.